संस्थेची ध्येय आणि उद्दिष्टे

१) परिसरातील प्रत्येक व्यक्तीचा सामाजिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक आणि बौद्धिकदृष्ट्या विकास करणे .

२)शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा याकरिता निरनिराळ्या शैक्षणिक उपक्रम राबविणे .उदा. बालवाडी ,अंगणवाडी ,प्राथमिक ,माध्यमिक शाळा .महाविद्यालय ,इंग्रजी ,मराठी आणि हिंदी माध्यम शाळा ,डि. एड ,बी. एड महाविद्यालय ,बालवाडी मार्गदर्शक केंद्र, तांत्रिक विद्यालय कला केंद्रे, संगणक प्रशिक्षण केंद्रे, तंत्रनिकेतन ,वैद्यकीय ,शेतकी महाविद्यालये स्थापन करणे व चालवणे.

३)विविध सण साजरे करणे.उदा : बुद्ध पोर्णिमा साजरी करणे .महाशिवरात्र, दहीहंडी ,गणेशोत्सव,नवरात्रोत्सव, कोजागिरी पोर्णिमा ,सार्वजनिक हळदी कुंकु समारंभ तसेच २६ जानेवारी ,१५ ऑगस्ट असे राष्ट्रीय सण साजरे करणे, सर्व आदरणीय राष्ट्रपुरुष यांच्या जयंती तसेच त्यांच्या स्मरणार्थ स्मृतिदिन साजरे करणे व त्यांच्या विचारांचा प्रचार करणे.

४) मुलांना निरनिराळ्या खेळाचे प्रशीक्षण देणे.तज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती करणे .उदा .कबड्डी ,खो-खो ,करते क्रिकेट बॉक्सिंग ईत्यादी.

५) सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे .गायन ,नृत्यकला ,इ. कलागुणांची जोपासना करणे .

६) परिसरातील गरीब मुलांना व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या, ,पुस्तक, गणवेश ,यांचे वाटप करणे ,हुशार विध्यार्थ्यांचा सत्कार करणे, मुलांमध्ये आत्मविश्वास , निर्णयक्षमता ,जिज्ञासू वृत्ती निर्माण करणे ,त्यांच्यातील अंगभूत कलागुणांना वाव देणे . 

७) शैक्षणिक योजनांचा लाभ घेणे .परिसरात वाचनालय ,ग्रंथालय स्थापन करणे .

८) परिसरातील मुलांसाठी व्यायामशाळा, क्रीडांगण ईत्यादींची सोय करणे. तरुणांमध्ये खेळाची आवड निर्माण करण्यासाठी देशी विदेशी खेळांची शिबिरे आयोजित करणे. विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करणे आणि त्यामध्ये विजयी झालेल्या खेळाडूंचा यथोचित गौरव करणे व त्यांना प्रोत्साहन देणे , सभासदांसाठी मैदानी खेळ उदा .खो-खो ,कब्बडी,टेनिस धावण्याच्या शर्यती तसेच इतर बैठी खेळ बुद्धिबळ, कॅरम वगैरेंचे आयोजन करणे.

९) समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना व्यसायाचे मार्गदर्शन शिबीर आयोजित करणे .

१०) शासनाच्या योजनांची माहिती देणे व त्याचा फायदा मिळवण्यासाठी सहाय्य करणे .

११) महिलांच्या विकासाच्या दृष्टीने शासन प्रणीत योजनांचे मार्गदर्शन करणे. निरनिराळ्या व्यवसायांचे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे. 

१२) परिसरातील लोकांकरिता वैद्यकीय सुविधा ,एम्ब्युलंस,उपलब्ध करून देणे. रक्तदान शिबीर आयोजित करणे.

१३) वृद्धाश्रम ,अनाथाश्रम ,वसतिगृहे ,आश्रमशाळा बालसंगोपन क्रेंद्रे,मुकबधीर मुलांसाठी तसेच अपंगांसाठी शाळा ,सैनिकी शाळा इ. चालविणे.

१४) पुरग्रस्त,दंगलग्रस्त,आपद्ग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे आणि नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्यांना मदत करणे .

१५ ) समाजातील अंधश्रद्धा, चुकीच्या रूढी प्रीयता नष्ट करण्यासाठी परिसंवाद ,परिचर्चा घडवून आणणे आणि त्यातूनच समाज प्रबोधन व परिवर्तन करणे. व्यसनमुक्ती शिबीर आयोजित करणे .

१६) गाव शहर आशा ठिकाणी जनजागृती शिबीर आयोजित करून पर्यावरण संबंधी महत्व पटवून देवून ''एक गाव एक झाड '' अशी वृक्ष वाढीसाठी योजना तयार करून जनतेकडून पर्यावरण समतोल राखण्याचे कार्य करून घेणे.

१७) प्रदुषणामुळे शेती व मासेमारी संपुष्टात आली आहे.अशा गावांना त्यांच्या बेरोजगारी व बिघडलेले आरोग्य ह्या बाबतीत प्रत्यक्षात भेट घेऊन त्यावर उपाय व मार्गदर्शन करणे. 

१८) पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जंगल संरक्षण व वन्य प्राणी संरक्षण विषयी विविध उपक्रम राबवणे पाणलोट क्षेत्र विकास , मृदुसंधारण ,वृक्षारोपण व बंध्बंधीस्ठी जालासिंचनाचे उपक्रम राबविणे. तसेच आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे तंत्राद्यान शेतक-यांपर्यंत पोहोचविणे.यासाठी विविध उपक्रम राबविणे व सुगंधी वनौषधींची , वनस्पतींची लागवड करणे.

१९) शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी कुपनलिका व विहिरी तसेच "पाणी आडवा पाणी जिरवा" ही मोहीम राबवणे , शासनाच्या मदतीने पिण्याच्या पाण्याचे उपक्रम राबविणे .

२०)आदिवासी व ग्रामीण भागातील जनतेच्या आर्थिक विकासासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार ,विविध महामंडळे ,स्वायत्त संस्था शक्य झाल्यास परदेशी तंत्रज्ञान व निधी यांचा उपयोग करून लोकांना वरील सेवा उपलब्ध करून देणे .प्रामुख्याने शेळीपालन ,कुक्कुटपालन ,दुग्ध विकास तसेच कुटीर उद्योग सुरु करणे .या संदर्भात खाडी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या सहाय्याने विविध उपक्रम राबविणे यासोबत वरील बाबतीत आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्र व मधुमक्षिका पालन केंद्र सुरु करणे.

20 comments:

  1. Majhi sastha aahe pan kame ghyayace pan aahe te apply kase karave te sanga

    ReplyDelete
  2. Mala paramedical takayche ahe te kase takayche ahe

    ReplyDelete
  3. मला सुशीषित बेरोजगार मुला साठी रोजगार उपलब्ध करायचा आहे त्याबदल माहिती द्यावी

    ReplyDelete
  4. मला माझ्या शैक्षणिक सुधार केंद्राची रजिस्टर नोंदणी करायची आहे. ती करता येईल का?

    ReplyDelete
  5. Mazi adhivasi nagari seva sahakari sanstha ahe pn mala be rojagar mula mulina tya sansthe marfath rojagar kasa upalabadh boil kiva shasana kadhun karj gheun tyana rojagar kasa upalabadha karata yeil yachi mahiti havi hoti

    ReplyDelete
  6. खूप महत्वाची माहिती आहेत..

    ReplyDelete
  7. खूप महत्वाची माहिती आहे

    ReplyDelete
  8. माझी संस्था आहे पण त्या मध्ये सरकारी कामे कशे घेऊ आणि त्या कामासाठी apply कशे करू व नवीन कामे बघण्यासाठी कोणती gov. ची site आहे का?

    ReplyDelete
  9. माझी स्वतःहाची संस्था आहे पण संस्थेच्या अंतर्गत काय काय मी कार्यक्रम राबयू शकतो आणि इतर गरजू लोकाना त्याचा लाभ कसा मिळवून देउ शकतो सहकार्य करावे 8830700124

    ReplyDelete
  10. मार्गदर्शक माहिती

    ReplyDelete
  11. मला बहुउद्देशीय द्वारे सहकारी पतसंस्था निर्माण करता येईल काय?

    ReplyDelete
  12. मी बहुउद्देशीय संस्था काढली आहे, तर बँकेत account open करण्यासाठी GST लागत आहे तर GST काढला आहे ,पण त्याच्यावर उद्योग propriter ship दाखवला आहे ते बरोबर आहे का

    ReplyDelete
  13. बहुउद्देशीय संस्था मंजूर करण्यासाठी काय काय लागते डॉक्युमेंट बद्दल माहिती मिळेल का असा कोणी एजंट आहे का

    ReplyDelete
    Replies
    1. 9890649349 सत्य साई सेवा हे संस्था रजिस्टर करून देतात

      Delete
  14. माझी बहुउदेशिय संस्था आहे पण संस्थथेला शासना मार्फत काम कस मिळवाचे ते माहित नाही

    ReplyDelete
  15. सुशिक्षित बेरोजगार संस्था स्थापन करायचे आहे याची मार्गदर्शन मिळेल का

    ReplyDelete